Ad will apear here
Next
‘देशाच्या गौरवात भर टाकण्याचे काम राम सुतार यांनी केले’
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार


मुंबई : ‘आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हे भारताचे कोहिनूर असून, आमच्याकडे असलेला हा ‘कोहिनूर’ अनमोल आहे. त्यांनी आपल्या कलेतून भारत देशाच्या गौरवात भर टाकण्याचे काम सातत्याने केले आहे,’ असे गौरवोद्गार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

मुनगंटीवार यांच्या हस्ते पद्मभूषण राम सुतार यांचा १६ जानेवारी २०१९ रोजी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार मंगलप्रभात लोढा, अनिल सुतार, सीमा रामदास आठवले, मंजू मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राम सुतार यांनी जगातील सर्वांत उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ निर्माण करून भारताची जगातील उंची वाढवली, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, ‘आजपर्यंत सुतार यांनी जे पुतळे निर्माण केले, ते फक्त हातांनी नाही, तर हृदयापासून बनवले असल्याने ते आपल्याशी बोलतात. ही ईश्वरीय देणगी त्यांना लाभली आहे. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचा उत्साह आणि त्यांच्या हातातील कला इतरांसाठी प्रेरणादायी आहे. समाजाला सुंदर बनवणाऱ्या अशा व्यक्तींचा जेव्हा गौरव केला जातो, तेव्हा इतर कलाकारांनाही त्यातून प्रेरणा मिळत असते. आता ते अयोध्येत श्रीरामाचा पुतळा बनवणार आहेत. एक राम दुसऱ्या श्रीरामाचा पुतळा निर्माण करत आहे. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आहेत. महाराष्ट्राच्या या सुपुत्राचा गौरव करताना आपल्याला खूप आनंद वाटतो.’

सत्कारमूर्ती राम सुतार यांनी आपल्या मनोगतात हातातील कला ही विश्वकर्म्याची देण असल्याचे सांगितले. कामाचे होत असलेले कौतुक हे प्रेरणादायी असून, १९४७ पासून आपण हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा निर्माण करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमात सीमा आठवले आणि मंजू लोढा यांनीही मनोगत व्यक्त केले. राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांचाही अर्थमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZOYBW
Similar Posts
पर्यावरण संवर्धनासाठी लोकप्रतिनिधींचा अनोखा निर्धार मुंबई : देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर विजयी झालेल्या काही खासदारांनी पुढाकार घेत आपल्या मतदारसंघात ‘जेवढी मते तेवढी झाडे’ लावण्याचा अनोखा निर्धार जाहीर करत पर्यावरण रक्षणाप्रती आपली कटिबद्धता जाहीर केली. या सर्व खासदारांचे अभिनंदन करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व
स्वच्छ कांदळवन अभियानाची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद मुंबई : राज्य सरकारच्या वन विभागातर्फे लोकसहभागातून राबविल्या जात असलेल्या स्वच्छ कांदळवन अभियानाची दखल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे. २०१५मध्ये कांदळवन कक्षाने सुरू केलेल्या स्वच्छ कांदळवन अभियानामध्ये मुंबई आणि परिसरातील ११.०३ किलोमीटर समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील आठ हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले
रिक्षाचालक प्रकाश माने बनले वृक्षलागवडीचे प्रेरणादूत मुंबई : उपजीविकेसाठी प्रत्येक जणच वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय-नोकरी करतो मात्र उपजीविकेच्या साधनाला सामाजिक जाणिवेची जोड देणारे फारच कमी असतात. दहिसर येथील रिक्षाचालक प्रकाश माने हे त्यातलेच एक आहेत. त्यांनी आपल्या रिक्षाला वेगवेगळी १० रोपे लावून अनोख्या पद्धतीने सजविले असून, या माध्यमातून ते वृक्ष लागवडीचा संदेशही देत आहेत
अण्णा भाऊ साठेंचे टपाल तिकीट एक ऑगस्टला प्रकाशित होणार मुंबई : आपल्या साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी शासन साजरी करत आहे. या निमित्ताने एक ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचे टपाल तिकीट प्रकाशित करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language